S M L

जागतिक निर्वासित दिन : बिहारला अभिमान मराठी तरुणाचा

20 जून आशिष दीक्षित / निखिल देवजगातल्या कित्येक देशांप्रमाणेच भारतातही लाखो निर्वासित कुटुंब आहेत. गेल्या वर्षी बिहारमध्ये आलेल्या कोसी नदीच्या महापुराने कित्येक लोकांची आयुष्यं उद्‌ध्वस्त केली होती. नुसती उद्‌ध्वस्तच केली नाहीत तर कित्येक जण निर्वासित झाले याची गणतीच नाही. पण हरियाणा केडरच्या एका तरूण मराठी अधिकार्‍याने कोसीने उद्‌ध्वस्त केलेल्या शेकडो कुटुंबांना नव्याने जीवन जगण्याची उमेद दिली आहे. अजित जोशी हे त्या तरूण अधिकार्‍याचं नाव आहे. ते हरयाणाच्या सेनापतीचे जिल्हाधिकारी आहेत.20 जूनच्या जागतिक निर्वासित दिनानिमित्त अजित जोशी यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत - गेल्यावर्षी पावसाळ्यात कोसीला नदीला आलेला महापूर म्हणजे निसर्गाचं रौद्ररूप म्हणावं लागेल. कोसीच्या जलप्रलयात हजारो गावं आणि लक्षावधी कुटुंब मोडून पडली. त्यात माझंही घर वाहून गेलं... ही व्यथा आहे बिहारमधल्या सेहेरसा जिल्ह्यातल्या मुसहरी गावातल्या सध्या निर्वासित असलेलल्या मुकेशची. मुकेशचं गाव पाण्याच्या तडाख्यामुळे जराही तग धरू शकलं नाही... ' गावात आणि घरात सगळीकडे पाणीच पाणीच झालं. इतकं की घरातल्या वस्तूच गायब झाल्या, ' मुकेश सांगतो. मुकेशच्या गावाच्या मदतीला धावून आला तो हरियाणातला सोनीपत जिल्हा. सोनीपतने मुसेहेरी गाव दत्तक घेतलं. आणि गाव पुन्हा नव्यानं उभं केलं. पुरानंतर मोडकळीला आलेल्या 147 घरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. 76 घरं नव्याने बांधण्यात आली. नवी आणि पक्की घरं मिळाल्याने मुकेश आणि गावकरी कमालीचे खुष आहेत. ' नवं घर नवं गाव सगळं काही चांगलं आहे. आता सगळं काही सुंदर आणि स्वप्नवत भासत आहे, ' अशी प्रतिक्रिया मुकेश आणि त्याची पत्नी बाई यांनी अभिमानाने दिली. मुसहरी गाव वसवणाच्या कल्पनेचे मूळ शिल्पकार सोनीपतचे जिल्हाधिकारी अजित जोशी आहेत . मूळ सोलापूरचे असलेल्या अजित यांनी सोनीपतमधल्या गावागावात जाऊन नवं गाव वसवण्याच्या कामासाठी पैसा उभा केला. या गावाचं उद्घाटन नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं. हे कार्य करून अजित जोशी यांनी महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. अजित यांच्यामुळेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं तोंड भरून कौतुक केलं.कोसी नदीच्या पुराला वर्ष उलटलं आहे. मुसेहेरी गावाचा मुकेश जेव्हा पूर आलेल्या प्रसंगाचं वर्णन करत होता त्याच्या आवाजात भय आणि पाण्याची दहशत जाणवली. त्याच्या स्वरात आर्त दुःख जाणवलं ते पुन्हा पूर येऊ नये म्हणून. तरीही पूर आला तरी नवं घरं वाहून जाणार नाही ही मुकेशची कल्पना मात्र सुखावून जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2009 10:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2009 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close