S M L

सचिनने आंध्रप्रदेशातील गाव घेतले दत्तक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2014 04:46 PM IST

सचिनने आंध्रप्रदेशातील गाव घेतले दत्तक

sachin tendulkar22

16 नोव्हेंबर : माजी क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने 'खासदार आदर्श ग्राम योजने'तंर्गत रविवारी आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तम-राजू कंदि्रका गावा विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. 110 कुटुंबे राहत असलेल्या या गावात अद्याप रस्त्याची आणि शौचालयाची सुविधा नाही. या गावात एकमेव शाळा असून तिथे फक्त पाचवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

पुत्तम-राजू कंदि्रका गावाची लोकसंख्या पाच हजार असून तो तिरुपती लोकसभा क्षेत्रात येतो. इथला मुख्य व्यवयाय शेती आणि दूध उत्पादन आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास सचिन तेंडुलकर जेव्हा गावात आला तेव्हा रंगीबेरंगी कपडे घातलेल्या गावकर्‍यांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. यावेळी सचिनने येथील गावकर्‍यांशी संवाद साधला असता, लोकांनी गावातील समस्यांविषयी सचिनला माहिती दिली.

सचिन तेंडुलकरने पुत्तम-राजू कंदि्रका गावाच्या विकासासाठी त्याच्या 'खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजने'तून तीन कोटी रुपये निर्धारित केले आहेत. तसंच 24 तास पाणी, शिक्षण आणि स्वच्छतेचं आश्वासनही सचिनने गावकर्‍यांना दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2014 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close