S M L

रामपाल समर्थक आणि पोलिसांमधल्या चकमकीत 6 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Nov 19, 2014 02:47 PM IST

रामपाल समर्थक आणि पोलिसांमधल्या चकमकीत 6 जणांचा मृत्यू

19 नोव्हेंबर :  अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठी आश्रमात लपून बसलेले हरियाणाच्या हिसारमधला बाबा रामपाल याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि रामपाल समर्थकांमधील चकमकींमध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात 5 महिलांसह एका चिमुकल्याचाही समवेश आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून, त्यांचे मृतदेह आज (बुधवारी) सकाळी आश्रमाकडून पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत.

आश्रमाबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवला असून पोलिसांनी आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. पोलीस आश्रमाची भिंत पाडून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी रामपाल समर्थकांना लवकरात लवकर आश्रम रिकामी करण्याचे आदेश दिले असून रामपाल समर्थकांमध्येही फूट पडल्याचं दिसत आहे. काल रात्रीपासून हजारो समर्थक स्वत:हून आश्रमाबाहेर पडून पोलिसांच्या गाड्यांमध्ये येऊन बसले आहेत. आतापर्यंत तब्बल 10 हजार समर्थकांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती हरियाणाच्या डीजीपींनी दिली आहे तर 5 हजारांपेक्षा जास्त लोक अजूनही आश्रमात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close