S M L

पाकिस्तान सुप्रिम कोर्टाने फेटाळली सरबजीतच्या दयेची याचिका

24 जून, इस्लामाबाद पाकिस्तान सुप्रिम कोर्टाने भारतीय कैदी सरबजीत सिंग याचा दयेचा अर्ज बुधवारी फेटाळून लावला. लाहोरमध्ये 1990 मध्ये जे बॉम्बस्फोट झाले होते त्यात सरबजीतचा हात असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. त्यामुळे पाक सरकारने त्याच्यावर बॉम्बस्फोट आणि हेरगिरीचा आरोप ठेवून त्याला 1991मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेली 18 वर्षं तो पाकिस्तानमधील लाहोरमधल्या लखपत तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र सरबजीतला शिक्षा होऊ नये यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्नशील आहे. सरबजीतची दयेची याचिका फेटाळल्याचा निर्णय न्या. रजा फय्याज अहमद यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला. त्यावेळी सरबजीतचे वकील राणा अब्दुल अहमद त्याची बाजू मांडण्यासाठी बुधवारी कोर्टात हजर नव्हते. बुधवारी त्याचा दयेचा अर्ज पुन्हा फेरविचार करण्यासाठी पाकिस्तानी सुप्रिम कोर्टात दाखल झालेला असताना कोर्टाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 1990मधल्या लाहोर बॉम्बस्फोटांमध्ये 14 लोकांचा बळी गेला होता. सरबजीत गुप्तहेर नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सरबजीतने त्याच्यावरची शिक्षा कमी व्हावी यासाठी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याकडे दयेचा अर्ज पाठवला आहे. त्यावर निर्णय होण्याची धुसर शक्यता सरबजीतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. सरबजीतच्या अर्जावर विचार होऊ शकतो, असं पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचं म्हणणं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संबंधित देशातल्या कैद्यांना चांगली वागणूक द्यावी, असा करार झाला आहे. त्यानुसार मानवतावादी दृष्टिकोनातून फाशीची शिक्षा सुनावलेल्या सरबजीत सिंगची सुटका करावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. त्याच्या शिक्षेसाठी फाशी हा चांगला पर्याय असू शकत नाही, असं पाकिस्तानला भारतातर्फे कळवण्यात आलं आहे. 1 एप्रिल 2008 साली सरबजीतला फाशीची शिक्षा होणार होती. पण मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल चर्चा झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी निर्णय देण्यास वेळ लावला, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2009 08:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2009 08:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close