S M L

2 जी घोटाळ्याच्या तपासातून सीबीआयचा 'पोपट' मोकळा

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2014 01:11 AM IST

2 जी घोटाळ्याच्या तपासातून सीबीआयचा 'पोपट' मोकळा

cbi21 नोव्हेंबर : 'बोलका पोपट' अशी टिप्पणी करून आरोपीचा पिंजर्‍यात उभं करण्यात आलेल्या सीबीआयसाठी आजचा दिवस धक्कादायक ठरलाय. सुप्रीम कोर्टाने या बोलक्या पोपटाची आज एका प्रकारे सुटका केलीये. सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांना 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाच्या तपासापासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

घोटाळ्यातील आरोपींना सिन्हा पाठिशी घालत असल्याचं प्रथमर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिलाय. धक्कादायक म्हणजे रणजीत सिन्हा यांच्या निवृत्तीला केवळ 12 दिवस उरले असताना कोर्टाने हा निर्णय दिलाय. देशातला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात अनेक मोठी मोठी नाव उजेडात आली.

या प्रकरणाचा तपास हा सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली होत आहे. रणजीत सिन्हा या प्रकरणातील काही आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे वर्षभरापूर्वी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सीबीआयला पोपट अशी उपमा दिली होती. आज सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील काही आरोपींना सिन्हा पाठिशी घालत असल्याच्या आरोपामध्ये प्रथमदर्शनी तथ्य  आढळल्याचे नमूद करत, या खटल्यापासून सिन्हा यांना सुप्रीम कोर्टाने दूर केले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2014 12:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close