S M L

यंदा देशात सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज

24 जून यंदा देशात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करणार्‍या सरकारने आता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीतल्या श्रमशक्ती भवनमध्ये मानसूनवर चर्चा करताना यंदाच्या पावसाच्या क्षमतेवर माहिती दिली. त्यावेळी समुद्रात निर्माण होणार्‍या अल निनोच्या परिणामांमुळे यावर्षी मान्सूनवर परिणाम झाल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याची माहितीही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.गेल्या काही दिवसांमध्ये देशात हलक्या तसंच मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीचं आगमन झालं होतं. पण त्या पावसामुळे जलसाठ्यांत काहीच वाढ झाली नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. भाक्रा नांगल धरणातला पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगढ या पाच राज्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची चिंताही चव्हाण यांनी बुधवारच्या बैठकीत बोलून दाखवली आहे. धरणातला पाणीसाठा 1 हजार 504 फूटांपर्यंत खालावल्यामुळे वीज निर्मितीवरही परिणाम होत असल्याचं ते म्हणाले आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यताही चव्हण यांनी बैठकीत बोलून दाखवली आहे. मानसून लांबणीवर पडल्याचा परिणाम खरीप पिकांवर होणार आहे. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत भारतात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली असल्याचंही ते म्हणाले. यंदा भारतात जर नीट मान्सून आला नाही तर गेल्या सात वर्षांपेक्षा जास्त शेतीचं नुकसान होणार असल्याची शक्यता कृषी आणि हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2009 03:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2009 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close