S M L

मोदींचं निमंत्रण स्वीकारलं, बराक ओबामा येणार भारतभेटीवर

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2014 11:49 PM IST

modi-obama_1_0_0_0_0_0_0_021 नोव्हेंबर : यंदाचा प्रजासत्ताक दिन नरेंद्र मोदी सरकारसाठी खास असणार आहे. सत्तेवर आल्यानंतरचा मोदी सरकारचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन तर असेलच पण या प्रजासत्ताक दिनासाठी खास अमेरिकेचे पाहुणे येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलं आहे. बराक ओबामांनी हे निमंत्रण स्वीकारलंय.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबराउद्दीन यांनी 'पंतप्रधानांनी आपल्या अमेरिका भेटीत त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आम्ही औपचारिक निमंत्रण पाठवलं त्यांनी निमंत्रण स्विकारलं आहे' अशी माहिती ट्विटरवर दिलीये. तर मोदींनी निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त करत 'या प्रजासत्ताक दिनाला आपल्याला एक खास पाहुणे येण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनाला येणारे पहिले अमेरिकी अध्यक्ष आहेत' असं ट्विट केलंय. पंतप्रधान मोदींनी या निमंत्रणाअगोदर बराक ओबामांनी यापूर्वी भारताला 2010 मध्ये भेट दिली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2014 11:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close