S M L

बंगळुरमध्ये भरस्त्यावर तरुणींशी छेडछाड

Sachin Salve | Updated On: Nov 24, 2014 04:16 PM IST

बंगळुरमध्ये भरस्त्यावर तरुणींशी छेडछाड

karnatak24 नोव्हेंबर : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये भर रस्त्यात पाच जणांनी तरुणींची छेड काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळची ही घटना आहे.

या तरुणी आपल्या कारमध्ये होत्या. एका प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमधून आईस्क्रीम आणण्यासाठी त्यांनी आपल्या ड्रायव्हरला पाठवलं. त्यावेळी पाच जणांनी त्यांची छेड काढली. या महिलांनी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलवर शूट केली आणि मीडियाकडे पाठवली.

पण याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीय. या पाच आरोपींपैकी तीन आरोपींचे हे फोटो जारी करण्यात आले आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2014 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close