S M L

जम्मू-काश्मीरमध्ये 71 तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2014 11:33 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये 71 तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान

jammu45 25 नोव्हेंबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 71.28 टक्के विक्रमी मतदान झालंय. तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान झालंय. जम्मु काश्मीरमध्ये 15 मतदारसंघात एकूण 123 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

या टप्प्यात सात मंत्री आणि 12 आमदारही स्पर्धेत आहेत. बंदिपूर मधला एक लहान स्फोट आणि श्रीनगरमधली दगडफेक वगळता मतदान शांततेत पार पडलं.

कारगिल आणि झंस्कारमध्ये तापमान उणे 9 पर्यंत खाली जाऊनही लोकं मतदानसाठी बाहेर आली. तर झारखंडच्या पलामु जिल्ह्यात दोन भुसुरुंग सापडले. याच परिसरात काही मतदारांवर गोळीबार करण्यात आला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 11:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close