S M L

जिहाद, जन्नत दूरच; 'त्या' चौघांना भारतात परतायचंय !

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2014 11:52 PM IST

जिहाद, जन्नत दूरच; 'त्या' चौघांना भारतात परतायचंय !

25 नोव्हेंबर : 'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, अब हमारी मुलाकत जन्नत में होगी' असं सांगून कल्याणमधून मे महिन्यांपूर्वी जिहादसाठी इराकमध्ये गेलेल्या चार तरुणांचा ठावठिकाणा लागलाय. चारही तरुण सुखरूप असून भारतात परतण्यासाठी इच्छुक आहे. या चार तरुणापैकी एक जण तुर्कीमध्ये आहे. या चारही तरुणांना परत आणण्यासाठी कें द्र सरकार मदत करणार आहे.

मे महिन्यात कल्याणमध्ये चार तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली पण त्याहुन धक्कादायक म्हणजे हे उच्चशिक्षित तरुण जिहादसाठी इराकमध्ये गेले असल्याचं समोर आलं होतं. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात मे महिन्याच्या 25, 26, आणि 27 तारखेला या चौघांची बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी नोंदवली होती. आरिफ एजाज माजिद, सईद फारुक तानकी, फहद, तन्वीर मकबूल आणि अमन नईम तांडेल अशी या चौघांची नाव आहे. हे चौघे इराकमध्ये सुरू असलेल्या साम्प्रदाईक युद्धात सहभागी होण्यासाठी गेले होते. या चार तरुणातील तिघे जण हे इंजियनियरिंगचे विद्यार्थी असून एक बारावीचा विद्यार्थी आहे. मध्यंतरी एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मात्र तो तरुण सुखरूप आहे. हे सगळे तरूण कुटुंबियांच्या संपर्कात असून भारतात परतण्यासाठी उत्सुक असल्याचं गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून समजतंय. या चौघांपैकी एकजण दगावल्याचा संशय होता. पण हा तरूण तुर्कस्थानात आहे आणि त्याला भारतात परत आणण्यासाठी सरकार मदत करणार आहे. धक्कादायक म्हणजे इराक-ओमान-सिरीया वंशवादी युद्धात सहभाही होण्यासाठी आम्ही जात असून, त्याप्रकारचे पत्र आरिफ एजाज मजीद याने आपल्या कुटुंबाला जाण्यापूर्वी लिहिले होते. या पत्रात 'हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, आप हमे खोजने की कोशिश मत करना, अब अपनी मुलाखत जन्नत मे होगी' अशा आशयाचा मजकूर पत्रात लिहलेला होता.अखेरीस या चारही तरुणांना जन्नत तर मिळाली नाही पण भारतात परतण्यासाठी तयारी करत आहे. पण हे तरुण इराकपर्यंत कसे पोहचले का पोहचले हे मात्र अजून कळू शकलं नाही. हे चारही तरुण भारतात येतील तेव्हांचं याचा उलगडा होऊ शकेल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 11:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close