S M L

इराकमध्ये 'ते' 39 भारतीय सुखरूप -स्वराज

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2014 02:52 PM IST

इराकमध्ये 'ते' 39 भारतीय सुखरूप -स्वराज

sushma swaraj in rajya sabha28 नोव्हेंबर : इराकच्या युद्धकुंडात 40 अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांचा मुद्दावरुन राज्यसभेत चांगलाच वाद पेटला. एकीकडे 40 पैकी 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा खोडून काढलाय. 40 पैकी 39 भारतीय जिवंत आहे असा दावा स्वराज यांनी केलाय. तसंच शोध सुरू ठेवावा की नाही हे संसदेच्या सदस्यांनी सांगावा असा सवालही स्वराज यांनी केला.

इराकमध्ये यादवी माजलीये या युद्धकुंडात 40 भारतीयांचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. एका न्यूज चॅनलने दिलेल्या बातमीनुसार जून महिन्यात या 40 भारतीयांचं अपहरण झालं होतं. आयसीस या दहशतवादी संघटनेनं 40 पैकी 39 जणांची हत्या केली. मात्र यातून एका जणाने पळ काढला त्यामुळे त्याचा जीव वाचला. संसदेत आज या 40 बेपत्ता भारतीयांचा मुद्दा पेटला. मात्र हे सगळे भारतीय जिवंत असल्याचं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हरजीत नावाच्या अपहरत भारतीयाने खुद्ध माहिती दिलीये. दहशतवाद्यांनी त्यांना इरबिलमध्ये घेऊन गेले तिथे भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांना वेगळं करण्यात आलं. त्यानंतर भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली. हरजीत त्यातून वाचला. आता आपल्याकडे दोनच पर्याय आहे. एकतर हे सत्य माणून शोध मोहिम थांबवावी अन्यथा हा विरोधाभास समजून शोध सुरू ठेवावा. ज्यांच्याकडून मदत मिळू शकते अशा सर्व शक्यता आम्ही पडताळून पाहिल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आहे. अशा एकूण सहा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व भारतीय जिवंत आहे असं कळतंय असा खुलासा स्वराज यांनी केली. त्यामुळे हरजीतच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा की सहा सूत्रांच्या माहितीवर ते संसदेनंच ठरवावं असा सल्लाही त्यांनी दिला. तसंच या भारतीयांच्या कुटुंबीयांना मी आतापर्यंत 5 वेळा भेटले आहे, असंही त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस मला अशा प्रकारचा कोणताही थेट पुरावा उपलब्ध होईल, त्यादिवशी मी सभागृहात ते स्पष्टपणे मांडणार मात्र सध्या माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे भारतीय जिवंत आहेत असंही स्वराज यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close