S M L

काँग्रेसचा हल्लाबोल, 'मोदी सरकार नाही तर यूटर्न सरकार'

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2014 06:40 PM IST

काँग्रेसचा हल्लाबोल, 'मोदी सरकार नाही तर यूटर्न सरकार'

ajay_makan_u turn01 डिसेंबर : हे मोदी सरकार नसून यूटर्न सरकार आहे असा घणाघात काँग्रेसने केलाय. आज (सोमवारी) काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने 'मोदी सरकारचे यूटर्न' ही पुस्तिकाच आता प्रकाशित केली आहे.

लोकसभेत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं?, असा सवाल काँग्रेसने विचारलाय. भाजपने सामान्य माणसांना मोठी स्वप्नं दाखवली होती, त्यापैकी एकही आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलेलं नाही अशी टीका काँग्रेसनं केलीये.

या पुस्तिकेत मोदींचे ट्विट आणि बातम्या देण्यात आल्यात. 180 दिवसांत मोदी सरकारने 25 यूटर्न घेतले. हे मोदी सरकार नाही तर 'यू टर्न सरकार' आहे अशी टीका काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close