S M L

छत्तीसगडमध्ये माओवादी आणि जवानांमध्ये चकमक, 13 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2014 12:58 AM IST

 naxal-Maoists-AFP01 डिसेंबर : छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा माओवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये चकमक झालीये. माओवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला या हल्ल्यात 13 जवान शहीद झाले आहे. चिंतलगुफा इथं माओवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. गेल्या दहा दिवसांपासून सीआरपीएफच्या जवानांचं माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांच्या एका तुकडीने गेल्या दहा दिवसांपासून माओवाद्यांचा नायनाट करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. या ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरचा वापरही करण्यात येत आहे. पण आज सकाळी 10 च्या सुमारास माओवाद्यांनी जवानांच्या दलावर हल्ला चढवला. माओवाद्यांनी गावातील लोकांना पुढे करून जवानांवर गोळीबार यात 13 जवान शहीद झाले. ही घटना चिंतलगुफापासून 9 किलोमीटर अंतरावर काशीपारा गावात घडलीये. या चकमकीत माओवाद्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शहीद जवानांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, - छत्तीसगडला झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय.

कधी थांबणार माओवाद्यांचे हल्ले ?

28 फेब्रुवारी 2014

छत्तीसगड - माओवाद्यांच्या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी शहीद

11 मार्च 2014

छत्तीसगड - जिरमघाटीमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 16 सीआरपीएफ जवान, 4 पोलीस कर्मचारी शहीद, 1 नागरिकाचा मृत्यू

11 मे 2104

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या सुरुंगस्फोटात 7 पोलीस कर्मचारी शहीद

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2014 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close