S M L

दिल्ली बलात्कार प्रकरणी नराधम टॅक्सी ड्रायव्हर अटकेत

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2014 10:53 PM IST

latur rape07 डिसेंबर : दिल्लीत उबर टॅक्सीत झालेल्या बलात्कार प्रकरणातल्या नराधमाला अखेर अटक करण्यात आलीये. या आरोपीला मथुरामधून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली. एका मल्टीनॅशनल कंपनी काम करणारी पीडित तरुणीने शुक्रवारी रात्री टॅक्सी पकडली. तिला झोप लागली तेव्हा ड्रायव्हरनं टॅक्सी दुसरीकडे नेली आणि तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप पीडितेनं केलाय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीत निदर्शनं झाली. या प्रकरणातल्या पीडित मुलीने प्रसंगावधान राखत टॅक्सीचा फोटो काढला आणि त्यामुळे पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी सुगावा मिळाला. त्यामुळे काही तासांतच मथुरामधून आरोपी अटक करण्यात आली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2014 10:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close