S M L

जीवनचरित्र : निऴूभाऊंचं

चंद्रकांत पाटीलनिळूभाऊ म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले यांचा जन्म 1931 साली पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळ खळदखानवली गावात झाला.महात्मा जोतीबा फुले यांच्या चुलत भावाच्या वंशातल्या निळूभाऊंना 11 भावंडं होती.लहानपणीच कांहितरी करण्याच्या उद्देशानं ते मद्रासला गेले होते. तिथली भाषा आणि सर्वच अनोळखी असल्यांन तेथून ते मध्यप्रदेशातल्या इटारसीला गेले. इथं त्यांचे चुलते स्टेशनमास्तर म्हणून नोकरीस होते. 3-4 वर्षे त्यांनी आपला मुक्काम ठोकला. तिसरीपर्यंतच शिक्षण त्यांनी हिंदी माध्यमातून घेतलं. त्यामुळं त्यांच्यावर हिंदीचा प्रभाव होता. नंतर ते पुण्याला आले.पुण्यात बापूराव जगताप यांनी बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिवाजी मराठा हायस्कूल सुरू केले होते. पुण्यातआल्यावर 1938 मध्ये निळूभाऊनी शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर त्यांनी आपलं शिक्षण थांबवलं. याकाळात केशवराव जेधे यांच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते आले. एस. एम जोशी, नानासाहेब गोरे, सानेगुरूजी यांच्या समाजवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.पुण्यात शिरूभाऊ लिमये यांनी राष्ट्रसेवा दलाची शाखा सुरू केली होती. निळू भाऊंच्यावर महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा पगडा होता. त्यामुळे 15-16व्या वर्षी ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. राष्ट्रसेवादलात त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून समाजवादी विचारांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. त्याआधी अल्पकाळ त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी नमस्ते सदा वत्सले मातृभूमीचे... स्वर त्यांनी आळवले होते. मात्र संघाचे विचार न पटल्याने संघाला त्यांनी नमस्ते केले. याच काळात त्यांनी जातीची उतरंड कशी असते याची कल्पना आली.निळू भाऊंनी मध्यप्रदेशात शिकत असतानाच शरच्चंद्र चटर्जी यांची हिंदीतली पुस्तकं वाचली होती. त्यामुळे त्याचा उपयोग त्यांना सेवादलाच्या कलापथकात झाला. सेवादलात पुलंच्या 'पुढारी पाहिजे', व्यंकटेश माडगूळकरांच्या 'बिन बियांचं झाड', 'कुणाला कुणाचा मेळ नाही' अशा एकांकिकांमध्ये त्यांनी अभिनयाचे पहिले धडे गिरवले.या कलापथकात आवाबेन देशपांडे या नृत्य बसवायच्या. त्यांनी निळू भाऊंची कवी वसंत बापट यांच्याकडे शिफारस केली. 15 ते 20 वर्ष त्यांनी सेवादलात पूर्णवेळ काम केले. समाजवादी चळवळीसाठी त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय निळूभाऊंनी घेतला होता. पण 'सूनबाई, घर तुझंच आहे' या नाटकात त्यांना रजनी मुथा भेटल्या आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.सेवादलात काम करताना त्यांना पैशाची अनेकदा अडचण यायची म्हणून त्यांनी पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये माळ्याचं काम केलं. या कॉलेजची आज फुललेली बाग निळूभाऊंनी उभारलेली आहे. त्यांनी या ठिकाणी 11 वर्षे माळ्याचं काम केलं. सेवादलात असताना त्यांचा संपर्क प्रसिद्ध साहित्यिक शंकर पाटील यांच्याशी आला. पाटलांच्या 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यात त्यांना संधी मिळाली. हे नाटक पाहून चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांनी त्यांना 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातल्या झेल्या अण्णा पाटलाची भूमिकेसाठी त्यांना निवडले. त्यानंतर 'पिंजरा', 'सामना', 'सिंहासन', 'शापित', यासारख्या सिनेमात निळूभाऊंनी आपला ठसा उमटवला. तो आजही मराठी मनात कायमचा उमटला आहे.'सामना' चित्रपटाने इतिहास रचला होता. या चित्रपटाची बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात निवड झाली. मात्र हा चित्रपट बर्लिनला पाठवण्यास शालिनीताई पाटील यांनी विरोध केला होता. तेव्हा राष्ट्रीय चित्रपट निवड समितीवर उमा डिकुन्हा आणि नर्गिस या सदस्य म्हणून होत्या. त्यांनी इंदिरा गांधी यांची तात्काळ भेट घेतली आणि हा चित्रपट बर्लिनला पाठवला नाही तर राजीनामा देण्याची धमकी दिली. त्यानंतर हा चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात पोहोचला या चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेमा म्हणून निळूभाऊंना पारितोषिक मिळालं. 'सामना' चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातील बेरकी झेले अण्णा पाटलाची भूमिका साकारण्याआधी त्यांनी राजकारण्यांच्या सर्व रंगाढंगाचा अभ्यास केला होता. राजकारणाच्या चालीतले, वागण्यातले, बोलण्यातले बारकावे त्यांनी नेमकेपणानं हेरले होते. तर राजकारण्यांची बोलण्याची ढब त्यांनी शंकर पाटलांकडून आत्मसात केली होती. थोडासा कोल्हापुरी आणि काहीस कर्नाटकी हेल त्यांनी आपल्या अभिनयातल्या बोलण्यात ठेवला होता. त्यांच्या अभिनयाला मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली होती. अनेकदा ही दाद त्यांना शिव्या खायला लावणारी होती. विशेषतः त्यांना महिलांच्या शिव्याशाप खायला लागायचे. अनेकदा ग्रामीण भागात त्यांच्यावर शिव्या खाण्याचे प्रसंग ओढवले. निळूभाऊंनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत निळूभाऊंचा मोलाचा वाटा होता. डॉ. श्रीराम लागू, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबरीनं निळू भाऊंनी चळवळीसाठी खूप प्रयत्न केले. परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी मोठा निधी उभा केला. त्यासाठी त्यांनी 'लग्नाची बेडी' हे नाटक केलं. डॉ. राम आपटे यांनी या व्यावसायिक नाटकाची कल्पना मांडली ती डॉ. श्रीराम लागू आणि बाबा आढाव यांनी ही कल्पना उचलून धरली.या नाटकात अभिनेत्री तनुजा हिनंही काम केलं होतं. या नाटकाचे महाराष्ट्रात 25 ते 30 प्रयोग करून 25 लाखाचा निधी उभा केला होता. हे नाटक परदेशातही नेले. त्यातून सरतेशेवटी 96 लाखाचा निधी जमा झाला होता. या पैशातून परिवर्तनवादी चळवळीच्या 60 ते 65 कार्यकर्त्यांनी दरमहा 1 हजार रुपये मानधन देण्याची व्यवस्था उभारली. त्यांची हि चळवळ अखेरपर्यंत सुरू होती. कांही वर्षापूर्वी त्यांनी पुण्यातला पौडजवळ करमोळी गावात 10 गुंठे जमीन खरेदी केली होती. या शेतात त्यांनी आपल्यातला माळी कायम ठेवला होता. म्हणूनच त्यांनी फुललेली पुण्याच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या बागेतली झाडं आकाशाला गवसणी घालताना दिसतात. उतारवयातही त्यांनी सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही. जातीची उतरंड काय असते याचा अनुभव घेतलेल्या निळूभाऊनीं अनेकदा जातीवादावर टिका केली होती. मराठी चित्रपटातला अभिनेत्याचा आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या या कार्यर्त्याची अखेर मराठी मनाला कायमचा चटका देवून गेलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2009 11:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2009 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close