S M L

भाताची लावणी आता सोपी !,वाचा अनोख्या या मशीनबद्दल

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2014 10:41 PM IST

भाताची लावणी आता सोपी !,वाचा अनोख्या या मशीनबद्दल

10 डिसेंबर : शेती करण्यासाठी वापरण्यात येणारे आत्याधुनिक तंत्रज्ञान आता भारतातही दाखल झाले आहे. भात लावणीचे मशीन आल्यामुळे आता शेतीचे काम सहजसोपे झाले आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात 50 हून अधिक टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. मात्र आपल्याकडे शेती पारंपारिक पद्धतीनेच केली जाते.आता मात्र हे चित्र बदलू शकतं. कारण संपूर्ण जगात वापरलं जाणारं भाताची लावणी करणार तंत्रज्ञान आता भारतातही दाखल झालंय. हे तंत्रज्ञान म्हणजे लावणी करणारं एक मशीन आहे. या मशीनला एक ट्रे बसवलेला असतो. या ट्रे वर भाताची रोपे लावून लावणी केली जाते. हे मशीन एका टॅक्टर सारखे दिसते आणि यामुळे एकटा माणूस 700 ते 10 हजार स्क्वेअर मीटरपर्यंतची लावणी करू शकतो. सर्वप्रथम 1960 मध्ये जपानमध्ये याचा शोध लागला. त्यानंतर आता इंडोनेशिया, व्हिएतनाम, साऊथ कोरिया, क्युबा, बांग्लादेश, म्यानमार या सगळ्याच देशात अशा प्रकारे लावणी केली जाते. आता तर हे मशिन भारतातही आलंय. विदर्भ आणि रायगडमध्ये जिथे सपाट भातशेती होते तिथं आपण अशा प्रकारे लावणी करू शकतो. पण कोकणातल्या छोट्याछोट्या दळ्यांमध्ये अशा प्रकारची लावणी करणं अवघड आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2014 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close