S M L

ट्विटरवरही मोदींचाच बोलबाला, पटकावला ‘गोल्डन ट्विट’ किताब!

Samruddha Bhambure | Updated On: Dec 11, 2014 12:04 PM IST

ट्विटरवरही मोदींचाच बोलबाला, पटकावला ‘गोल्डन ट्विट’ किताब!

11 डिसेंबर : सर्वाधिक रिट्विटचा 'गोल्डन ट्विट' किताब पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या ट्विटला मिळाला आहे. 'पंतप्रधान' बनण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणारे नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाप्रमाणेच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरही दबदबा निर्माण केला आहे.

दरवर्षी ट्विटरच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार्‍या व्यक्तींचा ट्विटरतर्फे वर्षाअखेरीस आढावा घेण्यात येतो. यंदाच्या '2014 इयर ऑन ट्विटर' या रिपोर्टमध्येही मोदींचाच दबदबा आहे. 2014ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर 'India has won! भारत की जय! अच्छे दिन आने वाले हैं', या मोदींच्या ट्विटला 70 हजार 515 वेळा रिट्विट करण्यात आलं आहे.

दरम्यान, वर्षभरात फॉलोअर्स वाढण्याचा विक्रमही मोदींच्याच नावावर नोंदवण्यात आला आहे. तर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत अमिताभ बच्चन हेच 'शहेनशहा' ठरले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतात. मंगळवारपर्यंत बिग बींचे 1 कोटी 18 लाखांहून अधीक फॉलोअर्स होते. मात्र, मोदी आणि आमिर खान यांचे फॉलोअर्स वाढण्याचा वेग बिग बींचे फॉलोअर्स वाढण्याच्या तुलनेत जास्त आहे.

सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती

  • अमिताभ बच्चन (@srBachchan) - 1 कोटी 18 लाख 18, 056
  • शाहरुख खान (@iamsrk)- 1 कोटी 2 लाख 46, 755
  • आमिर खान (@amir_khan)- 98 लाख 66, 492
  • सलमान खान (@Beingsalmankhan) - 94 लाख 26, 989
  • नरेंद्र मोदी (@narendramodi) - 85 लाख 47, 911

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close