S M L

कर्नाटक विधानसभेत भाजप आमदारांचा टाईमपास

Samruddha Bhambure | Updated On: Dec 11, 2014 04:42 PM IST

कर्नाटक विधानसभेत भाजप आमदारांचा टाईमपास

11 डिसेंबर :  आपल्या आमदारांच्या वाईट वर्तवणुकीमुळे कर्नाटक भाजपला पुन्हा एकदा शरमेनं मान खाली घालावी लागली आहे. बेळगाव येथे सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उसाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा सुरू असताना भाजपचे एक आमदार मोबाइलवर प्रियंका गांधींचा फोटो बघत होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणारे कर्नाटक भाजपचे आमदार आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

अडीच वर्षांपूर्वी कर्नाटकात भाजपचे काही आमदार सभागृहात मोबाईलवर अश्लील चित्रफित बघताना आढळून आले होते. त्यावेळी त्यांच्यातील एका मंत्र्यासह बाकीच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा बेळगावातील अधिवेशनात भाजपचे औरादचे आमदार प्रभू चव्हाण हे नव्या वादात अडकले आहेत. बुधवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आपले मत मांडत होते. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना भाजपचे आमदार प्रभू चव्हाण मात्र प्रियंका गांधींचा फोटो मोबाइलवर झूम करून बघत होते. एकढच नाही तर त्यानंतर ते चक्क कँडी क्रश खेळत बसले होते.हा सगळाप्रकार टी.व्ही फुटेजमधून समोर आला आहे.

टीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने शरमेनं मान खाली घालाव्या लागलेल्या भाजपला टीकेचा सामना करावा लागतोय. अशा प्रकारच्या घटना सतत घडत असल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात मोबाइलवर बंदीचा विचार मांडला होता. आता अध्यक्षांच्या या मतावर लवकरचं निर्णय घेतला जाईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close