S M L

भारताची रशियाला साथ, दोन्ही देशात द्विपक्षीय करार !

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2014 11:26 PM IST

भारताची रशियाला साथ, दोन्ही देशात द्विपक्षीय करार !

india_Russia11 डिसेंबर : भारत आणि रशियाचे संबंध आणखी दृढ होण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौर्‍यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय करार झाले आहे. त्यामध्ये संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा यांचा समावेश आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुतीन आणि मोदींच्या भेटीत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली. उर्जा, संरक्षण आणि हिर्‍यांचा व्यापार याव्यतिरीक्त अनेक विषयांवर दोन्ही देशांमध्ये आज करार होणार असल्याची शक्यताही होती. मात्र तुर्तास भारताने रशियासोबत द्विपक्षीय करार केले आहे. जागतिक परिस्थिती कितीही बदलली तरी रशिया हा भारताचा महत्त्वाचा मित्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, युक्रेनच्या मुद्द्यावरून एकटे पडलेल्या रशियासाठी भारताबरोबरचे हे व्यापार करार रशियाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात `जी- 20` परिषद पार पडली. या परिषदेत युक्रेनच्या मुद्द्यावरून सदस्य देशांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना एकटे पाडल्यामुळे अडचणीत सापडलेले पुनित परिषद अर्ध्यावरच टाकून रशियाला रवाना झाले होते. रशियानं युक्रेनमधील सैन्य मागे घ्यावं नाहीतर रशियावर आणखी आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तसंच माघार घेण्यासाठी जगभरातूनही रशियावर दबाव टाकण्यात येतोय. त्यामुळे रशिया सध्या अडचणीत आहे आणि भारताबरोबरचे हे व्यापार करार रशियाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2014 11:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close