S M L

आयसीसचं ट्विटर अकाऊंट चालवणार्‍याला अटक

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2014 02:07 PM IST

आयसीसचं ट्विटर अकाऊंट चालवणार्‍याला अटक

isis_twitter13 डिसेंबर : इराकमध्ये यादवी माजवणार्‍या आयसीस ISIS या दहशतवादी संघटनेचं ट्विटर अकाऊंट चालवणार्‍या एका व्यक्तीला बंगळूरू पोलिसांनी अटक करण्यात आलीये. या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयए, एबी आणि रॉ संयुक्तपणे या आरोपीची चौकशी करणार आहेत.

इंग्लंडमधील 'चॅनेल 4' या चॅनेलनं हे ट्विटर अकाऊंट बंगळूरुमधून चालवलं जात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी शोध सुरू केला होता. या चॅनेलनं आयसीसचं अकाऊंट चालवणार्‍या व्यक्तीशी बातचीत केली होती. त्यावरुन ही माहिती मिळाली. आपण भारताविरुद्ध युद्ध पुकारत नसल्याचं त्या आरोपीचं म्हणणं आहे अशी माहिती तपासातून पुढे येतेय. चॅनेल 4 नं ही बातमी दिल्यानंतर हे अकाऊंट बंद करण्यात आलं होतं. कल्याणमधील आरीफ माजिद या युवकाला अटक केल्यानंतर या ट्विटर अकाऊंटवर तपास यंत्रणांचं लक्ष होतं. याच ट्विटर अकाऊंटवरील मजकुरानं आरीफ प्रभावीत झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2014 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close