S M L

शतकातलं सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण

21 जुलैशतकातलं पहिलं आणि सर्वाधिक वेळेचं खग्रास सूर्यग्रहण बुधवारी होणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता देशभरातल्या खगोलप्रेमींना लागली आहे. बुधवारी सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी या सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. चंद्राची गडद छाया गुजरातजवळच्या खंबातच्या आखातापासून पृथ्वीवरचा आपला प्रवास वेगानं सुरू करेल. त्यानंतर काही वेळातच ही सावली सुरतला अंधारमय करून ईशान्येकडे सरकेल. चंद्राची गडद छाया गुजरातजवळच्या खंबातच्या आखातापासून पृथ्वीवरचा आपला प्रवास वेगानं सुरू करेल. त्यानंतर काही वेळातच ही सावली सुरतला अंधारमय करून ईशान्येकडे सरकेल. या वेळी सावलीचा वेग प्रतीसेकंद 9 किलोमीटर असेल. भारतातून अरूणाचल प्रदेश, आसाम मधून 4 मिनिटांपर्यंत हे ग्रहण पाहता येईल. या शिवाय उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदूरबारमधून हे सूर्यग्रहण दिसणार आहे. नंदूरबारमधून दिसणारे हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमीची गर्दी वाढली आहे. तसंच इंदूर. खाडवा या शहरांमधूनही हे सूर्यग्रहण पाहाता येईल. हवामानानं साथ दिल्यास इथं 3 मिनीटं 5 सेकंद एवढा काळ ग्रहणाची खग्रास अवस्था राहील. शतकातलं सगळ्यात मोठं सूर्यग्रहण आपल्याला पहायला मिळणार आहे.या खग्रास सूर्यग्रहणा विषयी आजही अनेक अंधश्रध्दा घराघरात आहे. या अंधश्रध्दा दूर होण्यासाठी म्हणून सूर्यग्रहणाविषयी अनेक ठिकाणी काही खगोलप्रेमी प्रबोधन करत आहे. लोकांना ग्रहणाविषयी शास्त्रीय माहीती देत आहेत. हे फक्त शतकातलं मोठं ग्रहणंच नाही. तर संपूर्ण भारतातून पुढच्या 105 वर्षांत असं ग्रहण दिसणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्रहण भारतापासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य लोकांमध्येसुध्दा या सूर्यग्रहणाबद्दल उत्सुकता आहे. सकाळी 6.22 च्या सुमारास गुजरातमध्ये सूर्य पूर्ण अंधारात जाईल...मध्य प्रदेश, आणि उत्तर प्रदेशही पाठोपाठ अंधारात जातील..चंद्राच्या या सावलीतून बिहार 6 वाजून 24 मिनिटांनी तर पश्चिम बंगाल 6 वाजून 26 मिनिटांनी जातील. साडेसहाच्या सुमारास दार्जिलिंगवरून सूर्य काळवंडलेला दिसेल. इतरही अनेक ठिकाणांवरून हे खंडग्रास ग्रहण दिसेल...सूर्य अचानक अंधारला, की पक्षी आणि प्राणी गोंधळून जातील आणि जमिनीवर विचित्र सावल्या पसरतील. पण घाबरून जाऊ नका. वर आकाशात एक सुंदरशी डायमंड रिंग दिसेल. चंद्रावरच्या डोंगरांवरून येणा-या प्रकाशामुळे ती आणखीच सुंदर दिसेल. अंधाराला लागलेलं... एक सुंदरसं कोंदण.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2009 03:54 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2009 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close