S M L

नशा तुम्ही करता, जीव जवानांचा जातो - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 14, 2014 02:33 PM IST

नशा तुम्ही करता, जीव जवानांचा जातो - मोदी

14 डिसेंबर :  अमली पदार्थांचा पैसा माफिया आणि दहशतवाद्यांकडे जातो आणि त्यांच्याच बंदुकीतल्या गोळ्यांनी आपल्या देशाचे रक्षण करणार्‍या जवानांचा जीव घेतला जातो, त्यामुळे ड्रग्जना नाही म्हणण्याची हिंमत दाखवा असं आवाहन आज पंतप्रधानांनी केलं. नव्या पिढीला या अमली पदार्थांपासून वाचविले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आकाशवाणीच्या कार्यक्रमाद्वारे केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) रेडिओवरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात अमली पदार्थांच्या मुद्द्यावर भर दिला.

डार्कनेस (अंधार), डिस्ट्रक्शन (विध्वंस) आणि डिव्हॅस्टेशन (विनाश) असे ड्रग्जचे हे 3-डी आहेत. ही मानसिक-सामाजिक-वैद्यकीय समस्या असून, आपल्याला त्याकडे त्याच दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आपण संबंधित व्यक्तीला दोष न देता, त्याला व्यसनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एखादा तरुण व्यसनाधीन होतो तेव्हा आपण त्याला वाईट मानू लागतो.

खरंतर तरुण वाईट नसतात, ड्रग्जस वाईट असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. वाईट सवयी अचानक लागत नाहीत. त्या हळूहळू वाढत जातात. पालकांनी मुलांमध्ये होणार्‍या बदलांकडे लक्ष द्यायला हवं आणि मुलांचे मित्र कोण आहेत, सवयी काय आहेत, ते कुठे जातात- काय करतात याकडे लक्ष ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही मुलांना वाचवू शकता, असंही पंतप्रधानांनी पालकांना सुचवलं.

हॉस्टेलमध्ये राहणारी अनेक मुलंही ड्रग्जच्या जाळ्यात सहज खेचली जातात. काहीवेळा मित्रांसोबत अमली पदार्थ चांगले आहेत, ती एक फॅशनच आहे असं वाटतं. परंतु, अमली पदार्थांमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि ड्रग्ज तुम्हांला मृत्यूच्या दारातही घेऊन जाऊ शकतात..त्यामुळे ड्रग्ज घेण्याची सवयच लागू देऊ नका, असं आवाहन पंतप्रधानांनी तरुणांना केलं आगामी काळात ड्रग्जचं व्यसन सोडवण्यासाठी, सेलिब्रिटींनाही आवाहन करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच ड्रग्जचा प्रश्न संपवण्यासाठी एक हेल्पलाईनही सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगत सोशल मीडियावरही #drugsfreeindia नावाने मोहीम चालवण्याचे आवाहन त्यांनी तरूणांना केले.

दरम्यान यावेळी त्यांनी आपण अंध क्रिकेट वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय संघाची आपण नुकतीच भेट घेतल्याचे सांगत त्यांचा उत्साह पाहून आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2014 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close