S M L

जम्मू-काश्मीर 49; झारखंडमध्ये 61टक्के मतदान

Samruddha Bhambure | Updated On: Dec 14, 2014 08:57 PM IST

जम्मू-काश्मीर 49; झारखंडमध्ये 61टक्के मतदान

14 डिसेंबर :  जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेसाठी आज (रविवार) चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडलं. जम्मू-काश्मीरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे सावट तसेच खराब वातावरणातही मतदारांनी मतदानासाठी प्रतिसाद दिला.

दरम्यान शोपियानमध्ये भाजप उमेदवार जावेद अहमद कादरी यांची एका मतदाराबरोबर बाचाबाची झाली. एका मतदानकेंद्रावर हा गदारोळ झाला. त्यामुळे काही वेळ मतदान बंद ठेवण्यात आलं होतं. तर डोरु परिसरात मतदानादरम्यान पीडीपी आणि कौंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामरी झाली. मात्र वेळीच पोलिसांनी ताबा मिळवत परिस्थिती नियंत्रणात राखली. हे किरकोळ अपवाद वगळता चौथ्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलं. या चौथ्या टप्प्यात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद या दिग्गजांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं. एकूण 18 जागांवर 182 उमेदवार स्पर्धेत आहेत. काश्मीर खोर्‍यातल्या श्रीनगर, अनंतनाग आणि शोपियाँ या तर जम्मू विभागातल्या सांबा जिल्ह्यात हे मतदान झालं.

नक्षलग्रस्त झारखंडमध्येही चौथ्या टप्प्याचं मतदान सुरळीत पार पडलं. इथेही मतदार नक्षलवाद्यांना न घाबरता मतदानासाठी बाहेर पडले. झारखंडमध्ये शेवटच्या टप्प्यात 15 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. धनबाद आणि बोकारो या 2 मतदारसंघांमध्ये नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झालं. तर उरलेल्या 13 मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ ठेवण्यात आलीये. मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी आणि इतर तीन मंत्र्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय. नक्षलझारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2014 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close