S M L

कोळसा घोटाळा : मनमोहन सिंग यांचाही जबाब नोंदवा - स्पेशल कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 16, 2014 12:09 PM IST

कोळसा घोटाळा : मनमोहन सिंग यांचाही जबाब नोंदवा - स्पेशल कोर्ट

16 डिसेंबर :  कोळसा घोटाळाप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश स्पेशल कोर्टाने सीबीआयला दिला आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर मनमोहन सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. या चौकशीचा स्टेटस रिपोर्ट 27 जानेवारी पर्यंत देण्यात यावा, असेही कोर्टाने आदेशात नमूद केले आहे.

कुमार मंगलम बिर्ला कंपनीला कोळसा ठेवा देताना मनमोहन सिंग हे तत्कालिन कोळसा मंत्री होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांना मनमोहन सिंग यांची चौकशी करायची होती. पण त्यावेळी सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांनी चौकशीसाठी नकार दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सीबीआयने कोणत्या मुद्यांच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, अशी विचारणा देखील कोर्टाने केली आहे. अखेर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सीबीआयला सिंग यांचा जबाब नोंदवून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोर्टाने फटकारल्यानंतर आता प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2014 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close