S M L

अतिरेकी भारतावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, हायअलर्ट जारी

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2014 11:12 PM IST

अतिरेकी भारतावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, हायअलर्ट जारी

17 डिसेंबर : पाकिस्तानमध्ये तालिबानी हल्ल्यानंतर भारतावरही दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं भारतावर हल्ल्याची तयारी केल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेनं दिलीये. भारतातील छोट्या-मोठ्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. 26/11 च्या हल्ल्याप्रमाणेच देशभरात हॉटेल्‌स आणि गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचा मनसुबा दहशतवाद्यांचा आहे. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

पाकमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता या संघटनांनी भारतावर सूड उगवण्याची तयारी केलीये. लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनेनं पुन्हा एकदा भारतावर हल्ल्याची तयारी केलीये. गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी देशभरातील छोट्या, मोठ्या शहरांत हल्ला करण्याची शक्यता आहे. छोटी मोठी शहरंच नाहीतर मेट्रो शहरांवरही हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये. शिमला, देहरादून आणि मनाली सारख्या शहरांवर हल्ला करून लोकांना ओलीस ठेवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आहे असा इशाराही गुप्तचर खात्याने दिलाय. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याप्रमाणे दहशतवादी हॉटेल्स आणि गर्दीची ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या व्यतिरिक्त दिल्ली-आग्रा यमुना एक्स्प्रेसही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. पाक हल्ल्याची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात एनएसजी कमांडोंना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2014 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close