S M L

हाफिज सईद विरोधातला खटला पाकिस्तानात अनिश्चित काळासाठी स्थगित

3 ऑगस्टमुंबई हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी हाफिज मोहम्मद सईद याच्या पाकिस्तानील खटल्यातील सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे ज्या न्यायधिशांसमोर ही सुनावणी सुरू होती, त्यांनाही काढण्यात आलं आहे. सुप्रिम कोर्टच्या परवेज मुशर्रफवरील टिपणीची पाश्‍र्वभूमी यामागे असल्याचं सांगितलं जातंय. या खटल्यासाठी नवीन न्यायाधीशांची नियुक्ती लवकर केली जाईल, असं पाकच्या ऍटर्नी जनरलने सांगितलं आहे.पाकिस्तानने बंदी घातलेल्या जमात-उद-दवा या अतिरेकी संघटनेचा हाफिज प्रमुख आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. जमात-उद-दवाच्या प्रमुखाविरुद्ध भारताकडे ईनफ पुरावे असल्याच्या कबूलीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनुसार पंजाब सरकारकडून लढणारे वकील जनरल रजा फारुक यांच्या रविवारी दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयाशी हा निर्णय जुळला आहे. 16 ऑगस्ट रोजी सुप्रिम कोर्टाने या खटल्यावर फेडरल गव्हर्नमेंट सरकारच्या विनंती वर दोन आठवड्यांची स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक आणि अटोर्नी जनरल लतिफ खोसा यांच्या म्हणण्यानुसार मुंबई हल्ल्यात सईदचा हात असल्याच्या पुराव्याशिवाय त्याला अटक करता येणार नाही. यूएन सेक्युरीटी काऊन्सिलने जमात-उद- दवा या संस्थेला लश्कर-ए-तोयबा या संघटनेचाच एक भाग असल्याचं घोषित केल्यावर डिसेंबर मध्ये हाफीज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. लाहोर हाय कोर्टाच्या आदेशावर 2 जूनला त्याची सुटका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2009 01:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2009 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close