S M L

ज्यांना धर्मांतर पटत नाही त्यांनी हिंदूंचंही धर्मांतर करू नये-भागवत

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 06:31 PM IST

M_Id_405192_Mohan_Bhagwat20 डिसेंबर : धर्मांतरावर देशभरात वाद पेटलाय त्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता मौन तोडले आहे. जर तुम्हाला हिंदू धर्मात धर्मांतर करून यायचं नसेल, तर हिंदुंचंही धर्मांतर करू नये असा इशारा भागवत यांनी दिलाय. तसंच धर्मांतर पटत नसेल तर धर्मांतरविरोधी कायदा आणा असं जाहीर मागणी भागवत यांनी केली. ते कोलकात्यात बोलत होते.

कोलकाता इथं झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतर कायद्यावर भाष्य केलं. आम्ही संकल्प केला आहे आणि हिंदू समाज जेव्हा एखादा संकल्प करतो तेव्हा तो संकल्प पूर्ण करतो. आपला संकल्प पूर्ण करण्यात जगात कुणाकडे इतकी ताकद नाही कारण हिंदू समाजाचा संकल्प हा कुणाच्याही विरोधात नाही. हे सर्व काही लोककल्याणासाठीच आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाजाची प्रगती झाली तेव्हा ती जगाची झालीये. ते पुढे म्हणाले, आम्ही यासाठी संमेलनं घेत आहोत आणि सर्व संत आम्हाला संकल्प देत आहे. त्यामागे सर्वांच्या भल्याचा हेतू आहे. सज्जनांना समर्थन देणे आणि दुर्जनाचा विरोध करणे हाच आमचा संकल्प आहे. हे आमचं हिंदू राष्ट्र असून आज हिंदू जागा होत आहे, त्यामुळे कुणाला घाबरण्याची गरज नाही. जे घाबरतात त्यांच्या मनात पाप आहे. हिंदूंनी कुणाच्या हिताविरोधी कृत्य केलं नाहीये.

तसंच हिंदू आतापर्यंत सहन करत आलाय, आता आमच्या देवानेच सांगितलं की, आपल्यावर होण्यारा अन्याय सहन करू नये, आता आणखी किती सहन करणार ?,केवळ आम्हीच नाहीतर जगालाही अनेक गोष्टी सहन करावं लागलंय. दुसर्‍यांकडे यावर उपाय नाही पण आमच्याकडे आहे. हिंदू आपली सुरक्षा स्वत:करू शकतो आणि जगाला कल्याण्याचा मंत्र देऊ शकतो. आम्ही फक्त आमच्या भल्ल्यासाठी नाहीच तर जगाच्या कल्याणासाठी पुढाकार घेत आहोत असंही भागवत म्हणाले. जी लोकं दूर केली आहे त्यांना परत आणणार, कारण ही लोकं आमच्यापासून दूर गेलीये. आपलं साहित्य चोरीला गेलं आणि ते परत घेतलं तर त्यात कुणालाही अडचण असता कामा नये. आणि जर कुणाला यात गैर वाटत असेल तर कायदा तयार करण्यात यावा. संसदेनं कायदा बनवण्यास तयारी दर्शवली आहे पण, काहींना त्याबद्दल अडचण आहे. हिंदू कोणत्याही परिवर्तनावर विश्वास ठेवत नाही. हिंदू धर्मात धर्मांतर हे आतून असतं त्यामुळे हिंदुंचंही धर्मांतर करू नका असं आवाहनही भागवत यांनी केलं. दरम्यान,  जबरदस्तीनं होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात कायदा आणण्यासाठी भाजप आग्रही असल्याचं भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं. सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close