S M L

जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपीला पहिली पसंती, तर झारखंडमध्ये भाजप आघाडीवर?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2014 12:38 PM IST

जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपीला पहिली पसंती, तर झारखंडमध्ये भाजप आघाडीवर?

21 डिसेंबर : झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल तर जम्मू- काश्मिरमध्ये पीडीपीला जनतेची पहिली पसंती तर भाजप दुसर्‍या स्थानावर राहील, असा अंदाज ऍक्सीस एपीएमच्या एक्झीट पोलमधले वर्तवला आहे. एक्झीट पोलच्या अंदाजानूसार पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू अजूनही कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

झारखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. जम्मू- काश्मिरमध्ये उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्स सरकारला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे  तर भाजपला आतापर्यंतच्या विक्रमी जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता असली, तरी इथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाला (पीडीपी) सर्वांत जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे.

या दोन राज्यांमधील मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा काल (शनिवारी) संपताच एक्झिट पोलचे निष्कर्ष जारी होऊ लागले. झारखंडमधील जनतेने नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारत तर काश्मिरींनी फुटीरतावाद्यांचे बहिष्काराचे आवाहन हाणून पाडत विक्रमी मतदान केले. झारखंडमध्ये पाचही टक्के मिळून सरासरी 66 टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 76 टक्के मतदान नोंदले गेले.

जम्मू काश्मिरमध्ये उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह 123 उमेदवारांचा भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं आहे. तर झारखंडमध्ये सहा जिल्ह्यातील 16 जागांसाठी मतदान झालं. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 208 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये मंगळवार 23 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होतील.

कौल काश्मिरचा : एकूण जागा - 87

पीडीपी - 36-41

भाजप - 16-22

काँग्रेस - 9-13

नॅशनल कॉन्फरन्स - 9-13

जेकेएनपीपी - 2-4

इतर - 4-6

कौल झारखंडचा : एकूण जागा - 81

भाजप - 34-38

एजेएसयू - 3-5

झारखंड विकास मोर्चा - 12-16

झारखंड मुक्ती मोर्चा - 10-14

काँग्रेस - 4-6

राजद - 3-5

इतर - 4-8

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close