S M L

गुजरातमध्ये 200 ख्रिश्चनांनी केले धर्मांतर

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2014 04:13 PM IST

गुजरातमध्ये 200 ख्रिश्चनांनी केले धर्मांतर

21 डिसेंबर : धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरूच ठेवली आहे. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अरनाई इथे ख्रिस्ती समुदायातील सुमारे 200 जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे. बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही असा दावाही विहिंपने केला आहे.

अरनाई या गावात शनिवारी व्हीएचपीने 'घर वापसी'चा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुमारे 200 ख्रिश्चन आदिवासींनी हिंदू धर्म स्वीकारला. हे सर्व जण आधी हिंदूच होते. मात्र त्यानंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा व्हीएचपीचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. या कार्यक्रमात महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले. घर वासपी करणार्‍या सुमारे 200 जणांनी यज्ञ केले आणि त्यानंतर प्रभू रामाचे चित्र व रुद्राक्षची माळ देऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. गुजरात सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल यांनी, या सर्व लोकांनी त्यांच्या पसंतीने धर्म बदलं असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हीएचपीच्या 'घर वापसी' कार्यक्रमावरुन गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असते. व्हीएचपीने जिल्हाधिकार्‍यांकडे कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close