S M L

द्रमुक नेते नेपोलियन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2014 06:59 PM IST

द्रमुक नेते नेपोलियन यांचा भाजपमध्ये प्रवेश

21 डिसेंबर :   माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे प्रमुख नेते डी. नेपोलियन यांनी आज (रविवार) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

चेन्नईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नेपोलियन यांनी हा निर्णय घेतला. अभिनेते असलेल्या नेपोलियन यांनी शनिवारीच द्रमुकमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तमिळनाडूत 2016 मध्ये विधानसभा निवडणूका होणार असून, त्यापूर्वी नेपोलियन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोड्याप्रमाणात का होईना तामिळनाडूत भाजपचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2014 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close