S M L

धर्मांतरावरुन राडा सुरूच,संसदेच कामकाज ठप्प

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2014 04:50 PM IST

धर्मांतरावरुन राडा सुरूच,संसदेच कामकाज ठप्प

loksabha_today322 डिसेंबर : धर्मांतराच्या मुद्दावरुन गेल्या आठवड्यभरापासून सुरू असलेलं राडा काही संपायचा नाव घेत नाहीये. संसदेच्या कामकाजाचे आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. पण धर्मांतर आणि काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून आज(सोमवारी) ही संसदेत गदारोळ सुरूच आहे. त्यामुळे आजचही कामकाज ठप्प झालंय.

धर्मांतराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं, या मागणीवर विरोधकांनी ठाम भूमिका घेतली आहे. सरकारनं आतापर्यंत ही मागणी फेटाळून लावली त्यामुळे तिढा वाढतचं चाललाय. दुसरीकडे धर्मांतर बंदी कायदा आणावा, अशी भाजपची मागणी आहे. संघ आणि भाजप नेत्यांकडूनही त्यासंदर्भातल्या वक्तव्यांमुळे गोंधळ वाढलाय. मागील शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतर कायदा आणा अशी मागणीच केली होती. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भागवत यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. धर्मांतराच्या मुद्यावरुन गेल्या आठवड्यात राज्यसभेत काहीच कामकाज झालं नाही. विमा आणि जीएसटी ही विधेयकं आज राज्यसभेत चर्चेसाठी ठेवली जाणार आहेत. पण विरोधक आक्रमक असल्यानं कामकाज होण्याची शक्यता कमी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2014 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close