S M L

काश्मीरमध्ये मोदींची जादू, पण विधानसभा त्रिशंकू

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2014 11:38 AM IST

narendra modi  twitter23 डिसेंबर : भारताच्या नंदनवनात अर्थात काश्मीरमध्ये सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचं पानिपत झालं आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पीडीपीने 26 जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्यापाठोपाठ मोदींची जादू इथंही पाहण्यास मिळालीये.

काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी असलेल्या नॅशनल काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर असून चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. सध्या सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे पीडीपी सरकार बनवण्याकडे वाटचाल करत आहे. पण बहुमताचा आकडा अजूनही दूरच आहे. दरम्यान, गरज पडल्यास भाजपचा पाठिंबा घेण्याची शक्यता नाकारत नाही अशी सुचक प्रतिक्रिया पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी दिली.

(सविस्तर बातमी लवकरच)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2014 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close