S M L

काश्मीरमध्ये त्रिशंकू, मोदींची जादू कायम

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2014 11:42 PM IST

s33modi_wish23 डिसेंबर : भारताच्या नंदनवनात अर्थात काश्मीरमध्ये सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचं पानिपत झालं आहे. पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पीडीपीने 28 जागांवर विजय मिळवला. तर त्यापाठोपाठ नरेंद्र मोदींची जादूही पाहण्यास मिळालीये. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भाजपने घवघवीत यश मिळवले असून 25 जागांसह दुसर्‍या स्थानावर आहे .पण जम्मू आणि काश्मिरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 87 जागांसाठी मतमोजणी झाली. बहुमतासाठी 44 जागांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. निकालानुसार पीडीपी 28, भाजप 25, नॅशनल कॉन्फरन्स 15, काँग्रेस 12 आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या आहे. पण एकाही पक्षाला बहुमत नसल्यानं किंगमेकर कोण याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सोनावारमधून पराभव झालाय तर बिरवाहमधून विजय झालाय. पण भाजपनं पहिल्यांदाच काश्मीरमध्ये मोठं यश मिळवलंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसमोर सर्व पर्याय खुले असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जम्मू, रांची आणि दिल्लीत एकच जल्लोष केला. तर भाजपच्या राज्यातील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. त्यांच्या मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झालंय अशी प्रतिक्रिया मोदींनी दिला.

काही शक्यता

पहिली शक्यता पडताळून पाहिली तर पीडीपी आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. पीडीपीच्या 28 आणि भाजपच्या 25 जागा मिळून 53 जागा होता. त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होता. दुसरी शक्यता अशी की, पीडीपीने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर पीडीपीच्या 28 जागा आणि काँग्रेसच्या 12 जागा मिळून 40 जागा होत्यात. पण तरीही आणखी 4 जागा लागतील. यासाठी अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यामुळे आता किंगमेकरची भूमिका कोण साकरणार हेही महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे पीडीपीच्या नेत्यांनी भाजपला सोबत घेण्यात काहीही गैर नाही असं विधान केलंय. जर पीडीपी आणि भाजप एकत्र आले तर चित्र स्पष्ट होईल.

एकूण जागा = 87

बहुमताचा आकडा = 44

शक्यता 1: (सर्वांत अधिक शक्यता)

पीडीपी 28 भाजप 25 = 53

शक्यता 2:

पीडीपी 28 काँग्रेस 12 = 40

शक्यता 3: (कमी शक्यता)

भाजप 25 नॅशनल कॉन्फरन्स 15 इतर 5 = 45

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2014 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close