S M L

अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न'

Samruddha Bhambure | Updated On: Dec 24, 2014 03:47 PM IST

अटलबिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना 'भारतरत्न'

Banner bharat ratna

24 डिसेंबर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आज (बुधवारी) देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर झाला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच 25 डिसेंबरला या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना 'भारतरत्न' जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.

थोड्याच वेळापूर्वी घेण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून वाजपेयी यांना 'भारतरत्न' देण्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. 2013 मध्ये सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना 'भारतरत्न' दिला होता.

वाजपेयी यांचा उद्या, 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने उद्या 'सुशासन दिन' साजरा केला जाणार आहे. आतापर्यंत देशातील 43 व्यक्तींना देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close