S M L

राज्यात दुष्काळाचं सावट : 129 तालुके टंचाईसदृश

8 ऑगस्ट,राज्यातल्या अनेक भागात पावसानं दडी मारली आहे. पीक आणि पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळं राज्यातल्या 129 तालुक्यात टंचाई सदृश स्थिती जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व तसंच, चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दहा जिल्ह्यांना कमी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. मराठवाडा, चंद्रपूर,यवतमाळमधल्या 107 तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडल्यानं दुष्काळसदृशस्थिती निर्माण झालीये. तर सोलापूर मधल्या 7,गडचिरोली 3,पुणे 2,सांगली 3,अमरावती,रायगड,नंदुरबार,जळगाव,बुलढाणा,वाशिम,कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळसदृशस्थिती आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आज महत्वपूर्ण बैठक होतेय.या बैठकीत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कृषिमंत्री शरद पवार सहभागी होणार आहेत. तसंच 8 दुष्काळग्रस्त राज्यातले मुख्यसचिव या बैठकीत सहभागी झालेत.या बैठकीत कमी पावसामुळं निर्माण झालेल्या समस्या.तसंच अन्न धान्याच्या वाढत्या किंमती यावरही या बैठकीत विचार करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 8, 2009 07:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 8, 2009 07:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close