S M L

रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Dec 26, 2014 03:21 PM IST

रघुवर दास झारखंडचे पहिले बिगर आदिवासी मुख्यमंत्री

26 डिसेंबर :  झारखंडमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय निरीक्षक जे. पी. नड्डा आणि विनय सहस्त्रबुद्धे यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली. दास यांच्या रुपाने झारखंडमध्ये पहिल्यांदाच बिगर आदिवासी चेहर्‍याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत आहे.

दरम्यान झारखंडला आता भ्रष्टाचार मुक्त सरकार मिळेल, अशी प्रतिक्रिया दास यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व घटकांचा विकासात समावेश केला जाईल तसेच अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले रघुवर दास यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्रीपद भूषवले असून पक्षाचे उपाध्यक्षही होते. येत्या सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या दास यांचे वडील टाटा स्टीलमध्ये कामगार होते. 1980पासून भाजपमध्ये सक्रीय असलेले पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून यावेळी त्यांनी तब्बल 70 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. दास हे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जातात.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2014 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close