S M L

रघुवर दास यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Samruddha Bhambure | Updated On: Dec 28, 2014 02:05 PM IST

रघुवर दास यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

28 डिसेंबर  : भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते रघुवर दास यांनी आज (रविवारी) झारखंडच्या  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर चार मंत्र्यांनीही शपथ घेतली. रांची येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमध्ये हा शपथविधी सोहळा झाला.

यावेळी निळकंठ सिंह मुंडा, चंद्रेश्वर प्रसाद सिंह, चंद्रप्रकाश चौधरी आणि लुईस मरांडी यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, थंडीमुळे दिल्लीतील अनेक विमान उड्डाणे रद्द होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.

झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 42 जागा मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. झारखंडमध्ये प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. रघुवर दास यांची मुख्यमंत्रिपदी भाजपकडून निवड करण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2014 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close