S M L

देशभरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी मात्र मुंबईत गाजावाजा नाही

14 ऑगस्ट देश भरात आज गोकुळाष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबई ठाण्यात मात्र यंदा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. H1N1चा फैलाव होउ नये म्हणुन अनेक बड्या आयोजकांनी आपल्या दहीहंड्या रद्द केल्या आहेत. मात्र छोटी गोविंदा पथंक दहीहंडी फोडण्याठी बाहेर पडलेली दिसतं होती. आजच्या संपुर्ण उत्सवावर H1N1ची छाया पडलेली दिसली. ठाण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या दोनही हंड्या H1N1च्या दहशतीमुळे कृष्णजन्माच्यावेळीच फोडण्यात आल्या. ठाण्याच्या संघर्ष मित्रमंडळने कृष्णाजन्माच्या वेळेस कोणताही गाजावाजा न करता प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. तसंच संस्कृती युवा प्रतिष्ठानने यांची मागील वर्षाची जागतिक विक्रम करणारी दहीहंडीही मास्क घातलेल्या गोविंदा पथकांकडूनच फोडण्यात आली. या दोन्ही हंड्या फोडण्यासाठी कोणीही सेलिब्रिटीज उपस्थित नव्हत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेच्या सर्व दहीहंड्या रद्द करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर मनसेनेही आपले सगळे दहीहंडी आयोजन रद्द केले. शरद पवारांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दहीहंडी आयोजन रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे यंदा मुंबईत दहीहंडी उत्सवात दरवर्षी प्रमाणे धामधूम दिसत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2009 09:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2009 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close