S M L

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: Dec 30, 2014 03:05 PM IST

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना दिलासा

30 डिसेंबर  :  गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती एन्काउंटर प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर ठेवलेले सर्व आरोप आज मागे घेण्यात आले. अमित शहांना या खटल्यातून क्लीनचिट देताना संपूर्ण आरोपमुक्त करण्यात आले आहे. दोन्ही खटल्याशी अमित शहांचा कोणताही संबंध नसल्याचे सीबीआयच्या कोर्टाने म्हटले आहे.

2005 मध्ये गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी असलेल्या सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप गुजरात पोलिसांवर आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असणार्‍या तुलसीराम प्रजापतीलाही पोलिसांनी 2006 मध्ये चकमकीत मारले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तपासात अमित शहा यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे काही काळ कोर्टानं शहांना गुजरातमधून तडीपारही केलं होतं.

दरम्यान, या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे सोहराबुद्दीनच्या कुटुंबियांनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2014 03:05 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close