S M L

देशभरात जागता पाहरा, बंगळुरवर ड्रोन्सची नजर

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 08:14 PM IST

देशभरात जागता पाहरा, बंगळुरवर ड्रोन्सची नजर

31 डिसेंबर : बंगळूरमध्ये झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनच्या रंग बेरंग होऊ नये म्हणून देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिल्ली, मुंबई, चेन्नई आदी मेट्रो शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगळूरमध्ये अधिक खबरदारी घेत 'ड्रोन्स'ने टेहाळणी करण्यात येणार आहे.

आज नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सगळीकडे होणार आहे. पण बंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटांची पार्श्वभूमी पाहता देशभरातल्या मोठ्या शहरांमधील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. बंगळुरू शहरातील विशिष्ट भागांमध्ये होणार्‍या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी पहिल्यांदाच रिमोट कंट्रोलने उडवत्या येणार्‍या ड्रोन्सचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय टेहळणीसाठी टॉवर्स उभारण्यात आले आहेत. टॉवर्समधल्या सुरक्षा रक्षकांकडे नाईट व्हिजनच्या दुर्बिर्णी असतील. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये शीघ्र कृती दल तैनात करण्यात आलं असून दिल्लीमध्ये 100 पेक्षा ट्रॅफिक पोलीस टीम्स रस्त्यावर असतील. याशिवाय दिल्लीतल्या महत्त्वाच्या मार्केट्सची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देण्यात आली. तर कोलकाता आणि हैदराबादमध्येही जादा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

अमेरिकाही दक्ष

अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्येही हाय अलर्ट आहे. जमीन, समुद्र आणि आकाश अशा तीन्ही मार्गाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी टाईम्स् स्क्वेअरमध्ये नवीन आय बॅाल बसवला जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close