S M L

नियोजन आयोगाचं नाव आता 'नीती आयोग'!

Samruddha Bhambure | Updated On: Jan 1, 2015 02:54 PM IST

नियोजन आयोगाचं नाव आता 'नीती आयोग'!

01 जानेवारी :  देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या नियोजन आयोगाचे आता 'नीती आयोग' असे नामकरण करण्यात आले आहे. 1950 च्या ठरावानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्लानिंग कमिशन म्हणजेचं नियोजन आयोगाच्या जागी नवी यंत्रणा आणण्याची घोषणा केली होती. तीन आठवड्यांपूर्वी यासंदर्भात मोदींनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. केंद्र आणि राज्यातील सहकार्य वाढवून टीम इंडिया म्हणून काम करण्यासाठी नवीन संस्था उपयुक्त ठरेल,तसचं आयोगाच्या कार्यप्रणालीतही बदल होतील, असे मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. नियोजन आयोग बरखास्त करण्याच्या दिशेने मोदी सरकारने नवीन वर्षात पहिले पाऊल टाकले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2015 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close