S M L

दिल्लीत फेब्रुवारीच्या मध्यात विधानसभा निवडणूक ?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 5, 2015 11:06 AM IST

878modivskejriwal

05 जानेवारी : भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात निवडणुकीची घोषणा होऊ शकत असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. सीबीएससीच्या परीक्षा मार्चच्या सुरुवातीला होतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीत बहुतेक वेळा एका टप्प्यात निवडणूक होते. यावेळी सुरक्षा दलांच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही. तसेच दिल्लीत यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये विशेष हिंसाचाराच्या घटना नाहीत, त्यामुळे निवडणुका शांततेत होतील अशी अपेक्षा आहे.

केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर भाजपने बहुतेक विधानसभा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या वेळी आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती. 2013 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीगडमध्ये विजय मिळवून देखील भाजपला दिल्ली जिंकता आली नव्हती.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपचा पराभव झाला होता. आम आदमी पक्षाने आतापर्यंत सर्व 70 जागांचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणापाठोपाठ झारखंड, जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस सावरलेला नाही. काँग्रेसने 24 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने अजून एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 5, 2015 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close