S M L

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 6, 2015 11:17 AM IST

पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार

06 जानेवारी : पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भारतीय चौक्या आणि गावांवर जोरदार गोळीबार करण्यात आला.

सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक आज जम्मूतील गोळीबाराने प्रभावित झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. पाकिस्तानी रेंजर्सकडून सोमवारी झालेल्या गोळीबारात एक बीएसएफचा जवान जखमी झाला होता. जम्मूतील सांबा आणि हिरानगर सेक्टरमधील जवळपास 45 भारतीय चौक्यांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे सांबा, हिरानगर आणि आर्निया सेक्टरमधल्या गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. तर आतापर्यंत तब्बल 7000 नागरिकांना गावांमधून हलवण्यात आलं आहे. या भागातील अनेक शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक परीक्षा रखडल्या आहेत. कथुआ जिल्हा प्रशासनाने सीमेजवळील सर्व गावांतील शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. सीमेनजीक 65 गावांना याचा मोठा फटका बसला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close