S M L

बिअंत सिंग यांचा मारेकरी 'तारा' अटकेत

Samruddha Bhambure | Updated On: Jan 6, 2015 02:10 PM IST

tara

06 जानेवारी : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या हत्येचा आरोप असलेल्या जगतारसिंग तारा याला थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. जगतारसिंग जेलमधून पळून गेला होता, त्याला तब्बल 10 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार थाई पोलिसांनी ही कारवाई केली.

खलिस्तान टायगर फोर्सचा स्वघोषित प्रमुख असलेला तारा याच्यावर बिअंत सिंग यांच्या हत्येचा आरोप आहे. 2004ला चंदीगडच्या बरेल जेलमधून भुयार खोदून तारा इतर तिघांसह नाट्यमयरितीनं पळून गेला होता. पळून गेलेल्या चौघांपैकी दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर ताराचा शोध सुरू होता.

या प्रकरणी त्याला कोर्टाने 2007 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2015 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close