S M L

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2015 09:44 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

jammu_kashmir_new309 जानेवारी : जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता उद्भवली आहे. काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असून याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवलाय.

जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका होऊन दोन आठवडे उलटले मात्र अजूनही सरकार स्थापन झाले नाही. त्यातच माजी मुख्ममंत्री ओमर अब्दुल्लांनी राज्यपालांची भेट घेतली आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करायला नकार दिला. त्यानंतर व्होरा यांनी काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची शिफारस केलीय. दुसरीकडे काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचालीही सुरूच आहेत. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीडीपीचे नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांची भेट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीये. सईद यांना मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. पण भाजपला उप-मुख्यमंत्रिपद हवं आहे. त्याशिवाय भाजपला आणखी दोन कॅबिनेट मंत्रिपदं हवी आहेत. पण एकच कॅबिनेट खातं देण्याची पीडीपीची तयारी आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2015 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close