S M L

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 1 जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Jan 11, 2015 12:48 PM IST

maoists attack

11 जानेवारी :  छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला लागूनच नारायणपूरची सीमा आहे. छत्तीसगड पोलिसांचे विशेष पथक माओवाद्यांच्या विरोधात कोंबिंग ऑपरेशन करून परत येत होते, तेव्हा बोथाच्या जंगलात माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. जखमी जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, माओवाद्यांनी याच जिल्ह्यात रस्त्याच्या कामावर असलेले 2 ट्रॅक्टर आणि मिक्श्चर मशीन जाळून टाकली. त्यामुळे 50 लाखांचं नुकसान झाले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2015 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close