S M L

वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची बदली

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2015 11:47 AM IST

वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची बदली

12 जानेवारी :  राजधानी दिल्लीतले महाराष्ट्राचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची अखेर बदली झाली आहे. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नियुक्तीवर त्यांची आज बदली करण्यात आली आहे. मलिक हे महाराष्ट्र सदनातल्या काही प्रकरणांमुळे वादात होते.

चार वर्षांपासून ते या पदावर होते. जुलै महिन्यात महाराष्ट्र सदनातल्या निकृष्ट जेवणाबद्दल तक्रार करुन एका मुस्लिम कर्मचार्‍याला उपवासाच्या दिवशी बळजबरी चपाती खाऊ घातल्यानं शिवसेना खासदार वादात अडकले होते. तसंच महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाचा वाद किंवा इतर वादग्रस्त घटना यामुळे मलिक यांच्या भूमिकेवरुन शिवसेना आणि भाजपचे खासदार नाराज होते.

त्यामुळे आज अखेर मलिक यांची महाराष्ट्र सदनातून उचलबांगडी करत श्रम आणि रोजगार मंत्रालयात पाठवण्यात आले आहे.

वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक

- बिपीन मलिक गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्राचे दिल्लीत निवासी आयुक्त होते

- महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींमुळे वादात

- महाराष्ट्र सदनातल्या निकृष्ट जेवणामुळे चपाती प्रकरणी वादात

- मराठी कलाकरांना महाराष्ट्र सदनात परवानगी नाकारल्याचा वाद

- महाराष्ट्र सदनातल्या गणेश उत्सवाला प्रतिकूलता दाखवल्यानं वादात

- महाराष्ट्र सदनाबद्दल लोकप्रतिनिधींच्या वारंवार तक्रारींकडे मलिक यांनी केलं होतं दुर्लक्ष

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2015 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close