S M L

मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागतंय -सोनिया गांधी

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2015 11:18 PM IST

32sonia_on_modi13 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार हुकूमशाही पद्धतीनं वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं. भूसंपादन विधेयकामध्ये केंद्र सरकारनं बदल केल्यामुळे काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीये आणि सरकारचं हे धोरण शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलंय. या बैठकीनंतर जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीची माहिती दिली. संघ परिवाराशी संबंधित काही व्यक्ती वारंवार जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करत आहेत, याबद्दलही कार्यकारिणीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी अजय माकन यांच्याकडे सोपवण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2015 11:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close