S M L

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 1 हजार रुपये दंड

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2015 01:21 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 1 हजार रुपये दंड

14 जानेवारी : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाबद्दल असलेला 200 रुपयांचा दंड आता थेट 1 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी, रेस्टॉरंटमधील विशेष स्मोकिंग झोन काढून टाकणे असा प्रस्तावही सरकारने मांडला आहे.

केंद्र सरकारने धूम्रपानविरोधी कायद्यामध्ये कठोर बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संदर्भात सरकारला एका समितीने काही शिफारसी केल्या होत्या. मात्र शेतकरी आणि तंबाखू उत्पादक उद्योगाशी संबंधित लॉबीच्या दबावाखाली सरकार या शिफारसी मंजूर करणार नाही अशी चर्चा होती. मात्र या दबावाला झुगारून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या शिफारसी स्वीकारल्या आहेत. केंद्र सरकार चालू वर्षात सिगारेट आणि अन्य तंबाखूयुक्त उत्पादनांचा व्यापार, व्यावसायिक उत्पादन, पुरवठा, वितरण आणि जाहिरातीला प्रतिबंध घालण्यासंबंधी सुधारित विधेयक संसदेत मांडणार आहे.

यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करण्यामध्ये 18 वर्षांखालील व्यक्तींचा समावेश न करणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या खरेदीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षं करणे, सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी टाकणे अशा कठोर नियमांचा समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close