S M L

सलमानला सुप्रीम कोर्टाचा दणका, शिक्षेवरची स्थगिती उठवली

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2015 02:40 PM IST

 सलमानला सुप्रीम कोर्टाचा दणका, शिक्षेवरची स्थगिती उठवली

14  जानेवारी : सलमान खानला आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला आहे. 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणातील शिक्षेला राजस्थान हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. राजस्थान हायकोर्टाने सलमानच्या याचिकेवर फेरविचार करून निर्णय घ्यावा, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

1998 मध्ये 'हम साथ साथ है', या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र राजस्थान हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने सलमान खानला मोठा दिलासा मिळाला होता.

या निर्णयाला राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाचा निर्णय रद्द ठरवला आहे. तसेच सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टाने पुनर्विचार करून अंतिम निर्णय घ्यावा असे सांगत सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा राजस्थान हायकोर्टाकडे पाठवले आहे.

काय आहे हे काळवीट शिकार प्रकरण :

  • 1998 : 'हम साथ साथ है'च्या शूटिंगवेळी काळविटाची हत्या
  • 17 फेब्रु. 2006 : सलमान सलमानला एका वर्षाची शिक्षा
  • वरच्या कोर्टाकडून सलमानच्या शिक्षेला स्थगिती
  • 10 एि प्रल 2006 : सलमानला 5 वर्षांची शिक्षा
  • 13 एप्रिल 2006 : सलमानला जामीन मंजूर
  • 24 जुलै 2012 : राजस्थान हायकोर्टाकडून सलमानच्या शिक्षेला स्थगिती
  • 9 जुलै 2014 : सुप्रीम कोर्टाची सलमान खानला नोटीस
  • 14 जानेवारी 2015 : सलमान खानच्या शिक्षेची स्थगिती सुप्रीम कोर्टानं केली रद्द

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2015 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close